Saturday, June 13, 2020

थोडे की जरुरत है






सायंकाळची वेळ.सुट्टीचा दिवस. निवांत क्षण.अंगणा मध्ये खुर्ची टाकून आकाशवाणीवरील गाणी ऐकत मी बसलो होतो.

"थोडा है ,थोडे की जरुरत है,
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है " 

हे आकाशवाणीवरील गाण्याचे बोल माझ्या कानावर पडत होते. गाण्यातील हे बोल बरचं काही मनाला सांगून जात होते.खरंच,माणूस हे सुंदर जीवन जगतो का?का बरं तो इतर भौतिक गोष्टीच्या पाठीमागे लागतो? त्याला जीवनाचा अर्थ का बरं कळत नसेल? असे नाना प्रकारचे प्रश्न मनात घोंगावू लागले.

    माणसाला जीवनामध्ये 'थोडं' म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही .प्रत्येक माणसाने त्याचा वेगवेगळा अर्थ लावला आहे. जे काही आपल्याजवळ ईश्वराने दिलेले 'थोडं 'आहे त्याचा अजूनही माणसाला शोध लागलेला नाही.म्हणूनच ,माणूस अजूनही 'थोडं' काही कमवायचंआहे.  याच्यासाठी नेहमीच धडपडत असतो.कमवायचं आहे म्हणून आयुष्यभर सैरावैरा धावत सुटतो. त्याची 'थोडं 'भरलेली झोळी काही पूर्ण भरली जात नाही.आहे त्याचा उपभोग घ्यायचा सोडून तो झोळी पूर्ण भरण्याचीच वाट पाहतो. 
म्हणूनच, कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या 
'सांगा कस जगायच?' या कवितेतून आपल्यालाच म्हणतात,

पेला अर्धा सरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

        आहे त्या थोडके पणात जीवन आनंदाने जगणारी माणसे या जगामध्ये आहेत. त्यांना आपण अल्पसंतुष्ट म्हणून हिणवत असतो, पण ज्या लोकांनी 'थोडं 'आहे त्यात जगणं पसंत करून समाधानाची पातळी गाठली आहे त्यांना निश्चितच सुख मिळत जाते.

    आज माणूस भौतिक सुखाच्या पाठी लागून मानसिक स्वास्थ्य हरवून बसला आहे . आज माणूसआपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करुन तरुणपणात पै-पै जमा करतो आणि म्हातारपण सारं दवा घेण्यात जातं. पैसा -पैसा म्हणून धावणारे हे माणसाचं हव्यासी मन कधीच समाधानाची पातळी गाठू शकत नाही. माणसाने आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवून आपल्या  सुखाची व्याख्या ठरवली पाहिजे.  निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते हे नेहमी आपण ऐकत असतो .आज आपल्याला जे काही 'थोडं' कमवायच बाकी आहे  त्यामध्ये निश्चितच निरोगी मन, निरोगी शरीर हेच असले पाहिजे.तरच  जीवन सुंदर आहे त्याचाआस्वाद घेता येईल. 

श्रीकृपा 

          

                    



No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...