तो म्हणाला," मी एका मोबाईल कंपनीत ग्राहक केंद्रात असतो." त्याला त्याच्या दररोजच्या इंग्रजी बोलण्याची एवढी सवय झाली होती की तो आपली मातृभाषाच विसरत चालला होता.
आजकाल इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यास प्रत्येक पालक महत्व देतो पण , मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगणं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात जगभर ते संशोधन झालं आहे, सुरू आहे त्या साऱ्याचे निष्कर्ष अगदी स्पष्ट आहेत.
वेद या अभ्यासकानं १९८३मध्ये केलेल्या संशोधनातून पुढील निष्कर्ष मांडले आहेत. दुसरी भाषा शिकताना अनौपचारिक (तोंडी संभाषणापुरत्या) पद्धतीनं शिकल्यास मेंदूचा गोलार्ध मदतीला येऊन जुजबी रीतीनं ती भाषा शिकता येते. (त्यात उच्च बौद्धिक क्रियेचा समावेश नसतो.) आपली मुलं ‘जॅक ॲण्ड जिल’ वगैरे बालगीतं म्हणतात व इंग्रजी भाषेचा केवळ मौखिक परिचय करून घेतात. ती क्रिया वरवरची व सोपी असते. प्रत्यक्ष औपचारिक शिक्षणात डाव्या गोलार्धावरच वैचारिक भार पडतो. त्यामुळं मेंदू थकतो. परभाषा शिकताना वय हाही महत्त्वाचा घटक ठरतो. वय वर्षं १०पर्यंत मूळ मातृभाषा प्रगत झाल्यावर परभाषा शिकणं सुलभ होतं.
एखादा माणूस इंग्रजी भाषेत बोलू लागल्यावर काही जण त्याला... खूपच हुशार समजतात...आपण काहीतरी वेगळे आहोत अशीही भावना इंग्रजी भाषेत फडफड बोलणारे काही जण अवास्तव ठेवतात. वास्तविकता वेगळी असतें. हे इंग्रजी येणारे , इंग्रजीचा आग्रह धरणारे लोक ना मराठीत पुढे जातात ना इंग्रजीत.ते केवळ बोलण्याच्याच पातळीवर थांबतात.
ख-या अर्थाने एखादी भाषा अवगत होणे म्हणजे त्या भाषेची सर्व अंगे आत्मसात करणे होय.कोणत्याही भाषेची सुरुवात श्रवण म्हणजे ऐकणे पासून होते.आपण श्रवण, भाषण ,संभाषण,लेखन अशा पायरीने भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करतो.परंतू जेंव्हा आपण आपले सर्जनशील विचार लेखनातून अथवा संभाषणातून व्यक्त करतो तेंव्हा त्या भाषेची सर्वोत्तम जाण असल्याचे दिसून येते.त्यामुळे केवळ बोलण्याच्या पातळीपर्यंत एखाद्या भाषेचा अभ्यास न करता ती सर्वोत्तम पातळी अवगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
खरंतर मी लिहितो, कारण की मला बोलण्यापेक्षा लिहिण्यातून व्यक्त होण आवडतं .कोणत्याही व्यक्तीची विचार करणेची सुरुवात ही त्याच्या मातृभाषेतूनच होते तशीच माझी मराठीतूनच होते. माझ्या भावना,जीवनानुभव अविस्मरणीय क्षण हे कधीकधी आपली लेखणीच्याद्वारे एखाद्याच्या आयुष्याला अविस्मरणीय कलाटणी देऊन जाऊ शकते. कधी ती मदतनीस म्हणून तर कधी ती मार्गदर्शक म्हणून काम करत असते. लिहीत असताना आपण स्वतःचा विचार तर करतोच करतो पण, आपण आपल्या व्यतिरिक्त समाजाचा आणि आजूबाजूला होणाऱ्या चांगल्या वाईट छोट्या-मोठ्या घडामोडींचा आपण विचार मांडत असतो. लेखन ही एक नशा असते. ती नेहमी लिहिण्यासाठी प्रवृत्त करत असते .त्यामूळेआपण अखंडित लिहिते झाले पाहिजे. जसा आपण आपल्या मातेचा अभिमान बाळगून तिची सेवा करतो तशीच सेवा आपल्या मराठी भाषेची करायला हवी. .तर ...आणि तरच ....माय मराठी जगेल आणि वाढेलही. चला तर आपण आजपासून माय मराठीतच बोलूया.
-श्रीकृपा

No comments:
Post a Comment